ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

अंजनगाव सुर्जी येथील तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा

अंजनगाव सुर्जी : महसुल विभागा मार्फत राज्यात दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल दिन व “दिनांक ०१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५” या कालावधीत “महसुल सप्ताह २०२५” साजरा करण्याबाबत महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१६२/आस्था-०१/ (ई-१) दिनांक २९ जुलै २०२५ पारीत झाल्यानुसार आज दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी तहसिल कार्यालय अंजनगांव सुर्जी येथील सभागृहात “उत्कृष्ट अधिकारी , कर्मचारी” यांचा गौरव प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच तहसिल कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम अंतर्गत (एक झाड माझ्या आईच्या नावे) या क्रार्यक्रमाअतंर्गत तहसीलदार पुष्पा सोळंके व नायब तहसीलदार श्री भगत ,श्री काळे श्री बमबोटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार पुष्पा सोळंके, तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार श्री भगत ,श्री काळे, श्री बमबोटे ,व प्रमुख उपस्थिती म्हणून लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधु, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, सहाय्यक महसुल अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, शिपाई तसेच कोतवाल व प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी यांनी सन २०२४-२५ या महसुली वर्षात प्रशंसनीय व उल्लेखनीय काम केल्यामुळे त्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
यामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल नायब तहसीलदार श्री. विजय भगत, प्रशस्तीपत्र देण्यात आले व श्री. राहुल चव्हाण, यांना उत्कृष्ट महसूल सहाय्यक म्हणून प्रशस्तीपत्र देण्यात आले. श्री.परिक्षीत गोस्वामी यांना ७/१२ संगणकीकरण कामाकरीता उत्कृष्ट सहाय्यक महसुल अधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र देण्यात आले. श्री.अनिल केदार मंडळ अधिकारी कापुसतळणी यांना उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र देण्यात आले.
कु. अंजली वसु ग्राम महसुल अधिकारी यांना उत्कृष्ट महसुल अधिकारी म्हणुन प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे.
श्री. निखील मनवरे यांना उत्कृष्ट पुरवठा लिपीक म्हणुन प्रशस्तीपत्र देण्यात आले.
श्री. संतोष सुरजुसे यांना उत्कृष्ट महसुल सेवक म्हणुन प्रशस्तीपत्र देण्यात आले
श्री. अढाऊ पोलीस पाटील यांना उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणुन प्रशस्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अरुण गुप्ता तलाठी यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार श्री. धिरज मिश्रा तलाठी यांनी मानले.

“……महसूल सप्ताहाची रूपरेषा दि.१ ऑगस्ट ला महसूल दिन साजरा करणे, महसूल अधिकारी, कर्मचारी यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करणे, दि.२ ऑगस्ट ला शासकीय जागेवर सन २०११ पुर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकुल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमण जागांचे पट्टे वाटप करणे,दि.३ पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, दि.4 ऑगस्ट ला छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र महाराजस्व अभियाना अंतर्गत प्रत्येक मंडल निहाय कार्यक्रम राबवणे, दि.५ ऑगस्ट ला विशेष सहाय्यक योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे, दि.६ ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कर्षित करणे व त्या अतिक्रमण मुक्त करणे तसेच शर्तबंग झालेल्या जमिनी बाबत शासन धोरणानुसार नियमानुकूल करणे, सरकार जमा करणे, दि ७ ऑगस्टला ” M-Sand” धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारोह साजरा करणे अशा प्रकारे कार्यक्रमाची रुपरेषा राहणार आहे अशी माहिती अंजनगाव तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी दिली आहे.”

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.