ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

भविष्यातील युद्धांमध्ये विजयासाठी संयुक्त प्रतिसाद महत्त्वाचा – सीडीएस जनरल अनिल चौहान

भविष्यातील युद्ध सीमांच्या पलीकडे असेल, यावरही सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी भर दिला.

नवी दिल्ली : भविष्यातील युद्धांमध्ये विजय सुनिश्चित करण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये जलद आणि निर्णायक संयुक्त प्रतिसाद देण्याचं आवाहन संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी केलंय. भविष्यातील युद्ध सीमांच्या पलीकडे असेल, यावरही त्यांनी भर दिला. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी (26 ऑगस्ट) मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर येथील आर्मी वॉर कॉलेजमध्ये आयोजित ‘रण संवाद’ कार्यक्रमामध्ये “तंत्रज्ञानाचा युद्धकौशल्यावर होणारा परिणाम” या विषयावर भाषण दिलं.

विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज : भविष्यातील युद्ध जिंकण्यासाठी संरक्षण आणि एकात्मिक लॉजिस्टिक्समध्ये आत्मनिर्भरता हे महत्त्वाचं असल्याचं सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले की, “संयुक्तता हा भारताच्या परिवर्तनाचा आधार आहे.” तसंच संयुक्त प्रशिक्षण संस्थात्मक बनवण्याची आणि ऑपरेशनल क्षमता वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर आणि क्वांटम सारख्या सतत विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज, यावर सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी भर दिला. तसंच मजबूत नागरी-लष्करी एकात्मतेसाठी सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सुदर्शन चक्र विकसित करण्याचं महत्त्व आणि वचनबद्धता, यावरही भाष्य केलं. जे ‘ढाल आणि तलवार’ दोन्ही म्हणून काम करेल. भविष्यातील युद्धे जिंकण्यासाठी विविध क्षेत्रात क्षमता विकसित करणं महत्त्वाचं असल्याचंही सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सांगितलं.

तंत्रज्ञानाच्या विविध आयामांवर संशोधन करणं आवश्यक : याचबरोबर, कौटिल्यचा हवाला देत सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सांगितलं की, “भारत प्राचीन काळापासून कल्पना आणि ज्ञानाचा स्रोत आहे. मात्र, भारतीय युद्धांचे वैज्ञानिक विश्लेषण किंवा रणनीतीवरील शैक्षणिक चर्चा, यावर फारच कमी साहित्य उपलब्ध आहे. युद्ध, नेतृत्व, प्रेरणा, मनोबल आणि तंत्रज्ञानाच्या विविध आयामांवर गंभीर संशोधन करणं आवश्यक आहे. भारताला मजबूत, सुरक्षित, आत्मनिर्भर आणि विकसित व्हायचं आहे. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा सर्व भागधारक एकत्रितपणे भविष्यासाठी तयार सैन्य बांधण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतील,” असं सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.