शासकीय मान्यताप्राप्त आदिवासी विकास विभागाच्या धारणी प्रकल्पाची नवीन कार्यकारिणी जाहीर

परतवाडा प्रतिनिधी : शासकीय मान्यताप्राप्त आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रम शाळा कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, नाशिक अंतर्गत धारणी प्रकल्पाच्या कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. दि. १४ सप्टेंबर, २०२५ रोजी परतवाडा येथील भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयात यासंदर्भात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेमध्ये विदर्भ अध्यक्ष साहेबराव मोहोड यांनी अध्यक्षस्थान भूषविले. निरीक्षकांच्या भूमिकेत पांढरकवडा प्रकल्प अध्यक्ष अतुल गणोरकर आणि पांढरकवडा प्रकल्प सचिव शंकर मोरे उपस्थित होते.
याशिवाय, विविध शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकशाही पद्धतीने झालेल्या मतदानाने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात भोकरबर्डी येथील उच्च माध्यमिक शिक्षक श्री विजय गोविंदराव शिंद यांची बहुमत मिळवून प्रकल्प अध्यक्षपदी निवड झाली. इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेतः
कार्याध्यक्षः दिनेश आगरकर (लवादा), उपाध्यक्षः आकाश शेळके (पंचशील आदिवासी आश्रम शाळा,बहिरम), प्रकल्प सचिवः संदीप रावळेकर (पिंपळखुटा आश्रम शाळा), स्त्रीअधीक्षका (महिला प्रतिनिधी): सौ शितल डवले, विभागीय सदस्यः गजानन धुपे (भोकरबर्डी) आणि उमेश धोटे (सलोना), राज्य प्रतिनिधीः आशिष नखाते (गुरुदेव आदिवासी आश्रम शाळा, म्हसोना), प्रसिद्धी प्रमुखः अरविंद राऊळकर यावेळी बोलताना विदर्भअध्यक्ष साहेबराव मोहोड यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि धारणी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

