राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निषेधार्थ सुरज धर्मे यांच्या नेतृत्वात कफन-दफन आंदोलन

अमरावती-पांढूर्णा राष्ट्रीय महामार्ग वरील वरुड-पुसला मार्गांवर अनेक ठिकाणी रस्त्यावर भेगा पडलेल्या आहे. तसेच जिथे डांबरीकरण झाले होते तिथे मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे.
पावसामुळे खड्डयात पाणी भरले जाते त्यामुळे वाहनचालकांना त्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात झालेले आहे.
२ सप्टेंबर २०२५ नंतर १५ सप्टेंबर २०२५ ला सुद्धा निवेदन देण्यात आले होते परंतू अजून पर्यंत राष्ट्रीय महामार्ग विभाग अमरावती कडून कुठलीच अंमलाबजावणी न झाल्यामुळे,युवा मित्र मंडळ, पुसला अध्यक्ष सुरज धर्मे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावर ‘ कफन-दफन’ आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा निषेध करण्यात आला. शे.घाट पोलिस स्टेशनचे ठाणेदान दिपकजी महाडिक, विरेंद्र अमृतकर, विष्णू पवार,संदीप वानखडे,अक्षय खराटे, योगेश विंचूरकर यांच्या मध्यस्थिने आंदोलन मागे घेण्यात आले.
सुरज धर्मे, प्रद्युम्न तवले, जावेद शेख, ॲड पवन वाडिवे, सचिन ढोके, धिरज सावरकर,शुभम वडस्कर,राजू वरुडकर,प्रमोद पाटील,कमलेश खपरीये, योगेश श्रीराव,विशाल कलंबे,विनोद पाटील, नितिन सावले, विलास मरकाम,सागर फरतोडे,बलदेव सावले,निलेश गोमकाळे,संजय बमनोटे, प्रशांत भाजीखाये,सागर हेडाऊ, महेश ठाकरे, रोषण डोंगरे,नितिन भोंडेकर,राजकुमार बागडे,गजानन पांडे,राजू वायकुळ,निलेश डोंगरे,अमर इवनाते,हर्षल ढोरे,नितिन वाघमारे,अविनाश हरले,सुरज ढोके, सुंदरलाल बारंगे,सागर कपिले,सुनील कुहीटे,जायेद शेख,निकेश ठाकरे,संजय उकार आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

