घरकुलाच्या रखडलेल्या मजुरी अनुदानासाठी बिडीओच्या कक्षात लाभार्थ्यांचा ठिया
मनसेचे पुरुषोत्तम काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन

परतवाडा प्रतिनिधी अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या १५८३ घरकुल लाभार्थ्यांची २०२१ ते २४ या आर्थीक वर्षातील मजुरीचे अनुदान अद्यापही प्राप्त न झाल्याने मनसे तालुका प्रमुख पुरुषोत्तम काळे यांनी जिल्हा परिषद व पंचायत प्रशासनाला याबाबत कारवाई करण्याबाबत मागणी केली होती. प्रशासनाने कुठलीच कारवाई न केल्याने आज २५ सप्टेंबर रोजी पुरुषोत्तम काळे यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी यांच्या कक्षात ठिया आंदोलन करत तत्काळ अनुदान वितरीत करण्याची मागणी केली, गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर हे ठिया आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले. अचलपूर तालुक्यातील १५८३ लाभार्थ्यांचे फिजीकली कंम्पलीट मजुरीचे अनुदान तत्काळ काढण्याबाबत, त्याचप्रमाणे वर्ककोड उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा कार्यालयाला माहिती कळविण्यात आली असुन याचाबत पाठपुरावा करण्यात येईल असे पत्र देण्यात आले. या ठिया आंदोलना दरम्यान जिल्हाध्यक्ष राज पाटील, विजय पोटे, विजय साखरे, श्याम जवंजाळ, अक्षय काजे, भूषण सोनटक्के, उज्वल मानेकर, ऋषिकेश सालकुटे, आकाश पातूरकर, विशाल वन्हेकर, भारत घोम, जगदीश ढेपे, गौतम सस्दार, अंकुश वाठ, सतिश धांदे, ज्ञानेश्वर हिवरकर, आदि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

