ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

सिगरेट पेक्षा जास्त धोकादायक अगरबत्ती? जाणून घ्या धुराचे धोके

बहुतांश घरात पूजा करताना अगरबत्ती पेटवील जाते. बाजारात विविध प्रकारच्या सुगंधीत अगरबत्ती उपलब्ध आहेत. परंतु अगरबत्तीच्या धुरामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवतात.

जगभरातील अनेक भागांमध्ये पूजा करताना अगरबत्ती अवश्य पेटवली जाते. यामुळे परिसर आध्यात्मिक देखील होतो. बरेच लोक फक्त दिवे आणि धूप जाळून पूजा करतात. भारतीय पूजा अगरबत्ती शिवाय अपूर्ण आहे. परंतु नॅशनल लायब्रिरी ऑफ मेडिसीनच्या मते, अगरबत्तीच्या धुरामुळे डोळे नाक, कान घसा, त्वचा, श्वसन समस्या, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीत, न्यूरोसायकॉलॉजिकल विकार, कर्करोग यासारख्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात असं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच 30 वर्षाहून अधिक काळ अगरबत्तीच्या दैनंदिन वापरामुळे मोठ्या प्रमाणात धुराच्या संपर्कात आल्यास 65 वर्षीय महिला गृहिणीला चक्कर येणे, थकवा, तीव्र अशक्तपणास खालच्या पायांना सूज येणे, हातपाय दुखणे आणि काम करताना धाप लागणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो असं अभ्यासात सांगण्यात आलं आहे. असं म्हटलं जातं की, सतत श्वास घेतल्याने सिगारेटपेक्षा जास्त गंभीर परिणाम होतात. यामध्ये कोणती रसायने आहेत? ते जाणून घेऊया.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.