ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार एन्ट्री

वरूड तालुक्यात वादळाचा तडाखा; अमरावती शहरात पाच तासांपासून कोसळधार

अमरावती/दर्यापूर जिल्ह्यात २४ तासांत तिवसा, दर्यापूर तालुक्यात सरासरी २५ मिमीपेक्षा जास्त मान्सूनपूर्व पाऊस झाला. मंगळवारी दुपारपासून वरुड तालुक्यासह जिल्ह्याच्या बहुतेक भागात पावसाची नोंद झालेली आहे.

अमरावती येथे कृषक कॉलनी, राम नगर परिसरात वीज कोसळली. अनेकांचे टी.व्ही, इन्वर्टर निकामी झाले. अॅड.किशोर शेळके, राठौड़, गावंडे यांच्याकडील टी.व्ही निकामी झाल्याची माहिती आहे. सुमारे पाच तास झाल्यानंतरही पाऊस कायम आहे.

तिवसा तालुक्यात दुपारी ४ च्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. शिरजगाव कसबा परिसरात तुफान वादळी पावसाने कांदा, उन्हाळी ज्वारी व आंबिया संत्रा फळाचे नुकसान झाले. चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वेत रिमझिम पाऊस अर्धा तास कोसळला. अंजनगाव सुर्जी, नेरपिंगळाई, मांजरखेड कसबा, अंजनसिंगी परिसरात सायंकाळी विजेच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस झाला. हा पाऊस बराच वेळपर्यंत बरसत राहिला.

पुसल्यातील आठवडी बाजाराचा फज्जा वरूड तालुक्यात शेंदूरजनाघाट, खाळा, सातनुर, पुसली, राजुरा बाजार, पुसत्ला, गणेशपूर, टेंभूरखेडा गव्हाणकुंड, जरूड शहापूरसह तालुक्यात संततधार पावसाने शेतीच्या मशागतीच्या कामांना खोडा घातला. राजुरा बाजारसह काही गावात घराची छपरे उडाली, तर पुसला येथे आठवडी बाजाराचा पावसामुळे फज्जा उडाला. तिवसा तालुक्यात पावसाची धुवां धार बॅटिंग सुरू आहे. नदी-नाल्यांना खळखळाट आला आहे. पथ्रोट, अचलपूर, कावली वसाड, हिवरखेड व परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.