कोर्ट म्हणाले, हिला घेऊन जा; सासरच्यांनी घराबाहेर काढले!
वरूड पोलिसांत गुन्हा नोंद

अमरावती : कोर्टाच्या आदेशानंतर सासरी पोहोचलेल्या विवाहितेला आमच्या घरात कशाला आली, म्हणून तिच्या सासू सासऱ्यांनी बेदम मारहाण केली. तथा गेटजवळ आणून घरातून निघून जा, असे बजावले. याप्रकरणी वरूड पोलिसांनी तिचा पती योगेश (३८), सासरा महादेव (६०), सासू व नणंद (सर्व रा. वरूड तालुका) विरूद्ध शनिवारी मारहाणीचा गुन्हा नोंदविला. फिर्यादीने आकोट न्यायालयात पतीविरूद्ध केस दाखल केली होती. ४ सप्टेंबर रोजी त्या केसचा निकाल देताना एक महिन्याच्या आत पतीने तिला घरी घेऊन जावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता.
आमच्या घरात कशाला आली?आमच्या घरात कशाला आली, अशी विचारणा करत अश्विनी हिचे केस पकडून तिला मारहाण केली. तथा गेटजवळ आणले, तर सासूने फुलाची मातीची कुंडी तिच्या डोक्यावर मारली. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. येथून निघून जा, असे बजावत तिला मारहाण केली. २६ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० ते ८.४०च्या सुमारास ती घटना घडली. त्यामुळे भेदरलेल्या अश्विनी हिने तातडीने वरूड पोलिस ठाणे गाठले.

