क्राइमताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

वरूडमध्ये तोतया पोलिसांकडून लुबाडणुकीची नकोशी ‘हॅटट्रिक’

पाच ग्रॅमच्या अंगठीसह पंचधातूची अंगठी हातचलाखीने पळविली

अमरावती : पुढे खून झाला आहे,तपासणी सुरू आहे. आम्हीही पोलिस आहोत, सुरक्षेसाठी तुमच्याकडील सोन्याचे दागिने काढून ठेवा, अशी बतावणी करून पुन्हा एकदा वरूड येथे एका ७१ वर्षीय वृद्धाला लुबाडण्यात आले. त्यांच्याकडील ५ ग्रॅमची सोन्याची व पंचधातूची अशा एकूण २५ हजार ६०० रुपयांच्या दोन अंगठ्या हातचलाखीने पळवून नेल्या.

२७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ३:१५च्या सुमारास पुसला रोडवरील एका दुकानासमोर ती घटना घडली. पोलिस असल्याची बतावणी करून लुबाडणुकीची ही वरूड येथील महिनाभरातील ही तिसरी घटना ठरली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी विनायक बोकडे (७१, रा. नागपूर) यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बोकडे हे वरूड येथे मुलीकडे पाहुणपणाने आले होते. जेवण झाल्यानंतर ते पुसला रोडवर पायदळ फिरत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. तथा पोलिस असल्याची बतावणी केली.

 

इराणी टोळी ताब्यात अन्य सदस्य सक्रिय वरूड शहरात यापूर्वी ६ व ९ सप्टेंबर रोजी दोघांनी पोलिस असल्याची बतावणी करून दोन घटनेत १०३ ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले होते. त्यानंतर एलसीबीने इराणी टोळीतील चौघांना अटक केली होती. त्यांनी वरूडच्या दोन्ही घटनांच्या कबुली दिली होती. ती टोळी पोलिसांच्या ताब्यात असताना वरूड येथे पुन्हा तशीच घटना घडल्याने त्या टोळीतील अन्य सदस्य अद्यापही सक्रिय असल्याचे दिसून आले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.