भाजपा नेत्या नवनीत राणा पोहोचल्या बांधावर
अमरावती : भाजपाच्या नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी रविवारी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यांतील गावागावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बाधित शेताची पाहणी केली. बांधावरूनच त्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे बळीराजाची व्यथा मांडली. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यासंदर्भात चर्चा केली.
शेतकऱ्यांचा कपाशी, सोयाबीन, ज्वारी व संत्रा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच कर्जबाजारी होऊन शेताची पेरणी केली. परंतु, दिवाळी सणाच्या तोंडावर अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा आनंद हिसकावल्याचे चित्र आहे. यामध्ये थिलोरी, माऊली, खल्लार, कोकर्डा, लेहगाव, सामदा, सांगळुद, सासन, सागंवा, चिचोंली, चिचोंरी रहिमापूर तसेच सातेगाव, गावंडगाव, काळगव्हाण, हिंगणी, चिचोली, टाकरखेड, धनेगाव, पांढरी, कापूस तळणी, हंतोडा, विहीगाव, दहिगाव रेचा, लखाळ, भंडारज, कोकर्ड आदी गावांतील शेताची पाहणी केली. यावेळी अजय देशमुख, अमोल कोरडे, किरण श्रीराव, चेतन ठाकरे, मदन बायस्कार, रवी ढोकणे, रती ठाकूर, विठ्ठल ढोले, अशोक श्रीराव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

