क्राइमताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण; 26 जीवनावश्यक वस्तूंचे कीट पाठविण्यात येणार -एकनाथ शिंदे

मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता शिवसेना सरसावली आहे. त्याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुंबई – मराठवाड्यातील पूरस्थिती अद्याप ओसरलेली नाही. अजूनही अनेकांची घरे पाण्याखाली आहेत. शेतकरी, कामगार असे सर्वजण पुरामुळे त्रस्त आहेत. शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. असे असताना आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं या भागात मदत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. याबाबतची घोषणा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

शेत जमीन आणि पिकांसह अनेकांची स्वप्नदेखील या पुरात वाहून गेली आहेत. त्यांना आज मदतीची गरज आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागाचा पाहाणी दौरा केला होता. त्यानंतर आजच्या मैत्रीमंडळ बैठकीत देखील शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेण्यात आले. मात्र, या शासकीय मदतीला वेळ लागणार आहे.

पुरग्रस्तांच्या मदतीबाबत एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात अनेकठिकाणी पूरस्थिती आहे. या भागाचे दौरे आम्ही सर्वांनी केले. अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. शेतकऱ्यांचं संकट खूप मोठं आहे. बोलताना त्यांच्या वेदना जाणवत होत्या. त्यांच्यामागे सरकार खंबीर उभं राहीलं आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीतदेखील याची चर्चा झाली. मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही. सुमारे 60 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचं आतापर्यंत समोर आलं आहे. पंचनामे सुरू असून काम सुरू आहे. सर्व अटी शर्ती नियम बाजूला ठेऊन त्यांना मदत केली जाणार आहे. नदी प्रवाहात शेत जमीन वाहून गेली. आता पाऊस थांबला असला तरी नदीच्या प्रवाहामुळे अद्यापही काही घरे पाण्यात आहेत.” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

मोठ्या प्रमाणात त्यांना मदतीची आवश्यकता आहे. आम्ही मागील आठवड्यापासून साहित्य पाठवण्यास सुरुवात केली आहे. संकट काळात आम्ही आमचे कर्तव्य बजावणार आहोत. मदतीचे तोरण हेच शिवसेनेचं धोरण आहे-उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे

 

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, आम्ही राज्यातील पूरस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील पत्र दिलं आहे. आतापर्यंत मोदी शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहिले आहेत. राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभे आहे. त्यांना मदत करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आम्ही प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्यांच्या घराची, शेताची आणि पशुधनाची पाहणी केली. त्यांना गहू तांदूळ देण्याची सुरुवात झाली आहे.

26 जीवनावश्यक वस्तूंचे कीट पाठवण्यात येणार-टॉवेल, सतरंजी साडी, चहा, पावडर, वह्या, फरसाण, तांदूळ, तूरडाळ, चणाडाळ, हळद, मीठ, आटा, लाल तिखट, साखर, निरमा पावडर, अंघोळ साबण, कपडा साबण, कंपास बॉक्स, पोहे, बेसन, रवा अशा एकूण 26 जीवनावश्यक वस्तूंचे कीट पाठवत असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांना मदत मिळण्याकरिता प्रयत्न-“त्यांचा संसार आम्हाला उभा करायचा आहे. बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता लोकांच्या घराघरात चांगला दिसतो. आमची आरोग्य यंत्रणा रवाना झाली आहे. सर्वांनीच अशा प्रकारची मदत करायला हवी. दौरा केला असताना काही मुलींनी आमची शाळा लांब असल्याचं सांगितलं. त्यांनी सायकल मागितली. आम्ही लगेच 20 सायकल पाठवल्या आहेत. दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांना मदत मिळायला हवी, असे आमचे प्रयत्न आहेतं.” अस एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.