ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

न्या. भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दर्यापूरात काँग्रेसतर्फे मूक मोर्चा

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर : देशाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या वर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात मनुवादी विचारसरणीच्या वकिलाने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज दर्यापूर शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

या मूक मोर्चात खासदार बळवंत वानखडे यांनी सहभाग नोंदवून हल्ल्याचा तीव्र निषेध केला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब हिंगणीकर, सुनिल गावंडे, संजय बेलोकार, ईश्वर बुंदेले, प्रदीप देशमुख, इंजि. नितेश वानखडे, कृ.उ.बा.स. दर्यापूर व खरेदी विक्री संघाचे संचालक, तसेच सेवा सहकारी सोसायटीचे संचालक उपस्थित होते.

मोर्चात दर्यापूर शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी वक्त्यांनी सांगितले की, हा हल्ला केवळ न्यायव्यवस्थेवर नव्हे, तर भारतीय संविधानाच्या मूल्यांवर झालेला हल्ला आहे. अशा घटना लोकशाहीसाठी धोकादायक असून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन संविधानाच्या रक्षणासाठी सज्ज राहिले पाहिजे, असा संदेश या मोर्चातून देण्यात आला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.