ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार होते. त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते.

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातील चाणक्य अशी ओळख असणारे माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले (वय 66) यांचे दुःखद निधन झालंय. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतरच त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. काल रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शहरातील साईदीप सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार होते. त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते.

सरपंच ते आमदार थक्क करणारा शिवाजी कर्डिलेंचा प्रवास : अहिल्यानगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे दररोज गावामध्ये दूध गोळा करून ते तालुक्याचे ठिकाणी विकत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यानंतर गावच्या राजकारणात सक्रिय होऊन ते सरपंच झाले. आता थेट आमदारकीला गवसणी घातली होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने अहिल्यानगरमधील एक मोठं राजकीय नेतृत्व हरपले. अहिल्यानगरच्या राजकारणामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवण्यामध्ये कर्डिले यांना मोठे यश मिळाले. त्यांचा राजकीय प्रवासदेखील अत्यंत रंजक राहिला, त्यावरती आपण एक नजर टाकू यात.

 

शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केलीय. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना! आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत! भावपूर्व श्रद्धांजली!, असंही रोहित पवारांनी एक्सवर लिहिलं आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.