महाराष्ट्र

नगराध्यक्षपदासाठी आरक्षण – अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निवडणूक रंगणार रोमहर्षक

-सचिन इंगळे (प्रतिनिधी)

अंजनगाव सुर्जी : नगराध्यक्षपदासाठी यंदा आरक्षण ‘अनुसूचित जाती’ (एच सी) प्रवर्गासाठी जाहीर होताच राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसह अनेकांची योजना अचानक अडचणीत आल्याचे जाणवते.

६ ऑक्टोबर रोजी आरक्षण जाहीर होताच, दिवाळीच्या धामधुमीतही राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार नव्या समीकरणाला सामोरे लागले आहेत. “ही संर्धा आता कोण जिंकणार?” असा प्रश्न आता सर्वांच्या तोंडावर आहे. मागील निवडणुकीत अनुसूचित जाती प्रभागातून नगराध्यक्षपद मिळवणारे काही माजी सदस्य आणि विद्यमान प्रतिनिधी यंदा आपल्या अपेक्षांवर पुनर्विचार करत आहेत.

राजकीय विश्लेषक म्हणतात, थेट नागरिकांच्या मताने नगराध्यक्ष निवडल्या जाणार असल्यामुळे, जास्तीत जास्त प्रभावी जनसंपर्क करणाऱ्या उमेदवाराला फायदा होणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुक आता सक्रिय झाले असून, प्रचार, भेटवस्तू, आणि जनसंपर्काच्या रणनीतींवर जोर दिला जात आहे.

यंदाची पंचवार्षिक निवडणूक रंगणार तीव्र स्पर्धेत, जिथे राष्ट्रीय पक्षाकडून कुणाला तिकीट मिळेल आणि कुणाला अपक्ष मैदानात उतरावे लागेल, यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत.

शेवटी, नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोणाची वर्णी लागेल  यावर शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.