ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, किमान ६ भाविकांचा मृत्यू

यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला अपघात झाला. या अपघातात किमान ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

नंदुरबार – अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला सकाळी अपघात झाला. चांदशैली घाटात वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. या अपघातात किमान ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात १० पेक्षा अधिक भाविक गंभीर जखमी असल्याची माहितीही मिळत आहे.

अपघात एवढा भयंकर होता की या अपघातातील मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस आणि वैद्यकीय पथक पोहोचलं असून मदत कार्य सुरू आहे. या अपघातातील जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात येत आहे. पोलीस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.