ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

फटाक्याचा वाद; तरुणाची हत्या

दिवाळीच्या दिवशी गुलिस्तानगरात थरार : मारेकऱ्याला अटक

अमरावती : अंगावर फटाका फेकल्याच्या कारणा वरून येथील २२ वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील गुलिस्तानगर परिसरात २१ ऑक्टोबर रोजी उशिरा रात्री ही घटना घडली.

पोलिस सूत्रांनुसार, अब्दुल सोहेल अब्दुल शफीक (२२, रा. गुलिस्तानगर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मो. मुस्तकीन मो. मुमताज (२४, रा. पॅराडाईज कॉलनी) याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआरनुसार, अ. सोहेल हा २० ऑक्टोबर रोजी फटाके फोडत होता. त्यावेळी त्याने आपल्या दिशेने फटाका फेकला व फोडला, असे मो. मुस्तकिनला वाटले. त्या कारणावरून मो. मुस्तकिन आणि अ. सोहेल यांच्यात वाद झाला होता. दरम्यान २१ ऑक्टोबर रोजी रात्री मो. मुस्तकिन हा अब्दुल सोहेलच्या घराकडे असलेल्या गुलिस्तानगरस्थित अल बझर हॉल परिसरात आला होता. त्यावेळी आधल्या दिवशीच्याच फटाक्याच्या कारणावरून त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादादरम्यान मो. मुस्तकिनने अ. सोहेलवर चाकूने वार केला. त्यातील एक वार थेट खांद्याजवळ केल्याने तो घटनास्थळीच कोसळला. मोठा रक्तस्राव होऊन त्यातच अ. सोहेलचा मृत्यू झाला.

यात मृतक व अन्य दोघांविरूद्धदेखील मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. मो. मुस्तकीनवर तलवार चालविली गेली.

आरोपीला अटक नागपुरी गेट पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यानंतर नागपूरी गेट पोलिसांनी आरोपींची शोधमोहीम राबवून मो. मुस्तकिन याला अटक केली आहे. ही कारवाई नागपूरी गेटचे ठाणेदार हनुमंत उरलागोंडावार व सहायक पोलिस निरीक्षक वैशाली चव्हान यांनी केली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.