महत्वाचे
एकता आणि अखंडतेसाठी धावणार अंजनगाव सुर्जी – Run for Unity उपक्रमाचे आयोजन.

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त “Run for Unity” या उपक्रमाचे आयोजन अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. हा उपक्रम दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६:३० वाजता आयोजित करण्यात येणार असून टाकरखेडा नाका ते लेंधे मार्केट, अंजनगाव सुर्जी या मार्गावर ही दौड पार पडणार आहे.
“एक दौड़ देश की एकता और अखंडता के लिए…” या संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या धाव उपक्रमाचे मार्गदर्शन ठाणेदार सुरज बोंडे, पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी व विविध सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

