महत्वाचे

अंजनगाव सुर्जी पोलीसांचा धडाकेबाज तपास – घरफोडीचे ५ गुन्हे उघडकीस

अंजनगाव सुर्जी, दि. 30 ऑक्टोबर — अंजनगाव सुर्जी पोलीसांनी घरफोडीच्या सलग पाच गुन्ह्यांचा छडा लावत ४ आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल ₹4,89,600/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून अंजनगाव सुर्जी शहर व परिसरात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी गुप्त बातमीदारांची मदत घेऊन तांत्रिक पुरावे जमा केले. तपासादरम्यान जुबेरोद्दीन कलीमोद्दीन (वय २२, रा. उस्माननगर, अंजनगाव) आणि नुरोद्दीन उर्फ मुक्का नजमोद्दीन (वय २४, रा. काजीपुरा, अंजनगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी शहरातील पाच घरफोड्यांची कबुली दिली.

त्यांच्या कबुलीजबाबावरून आणि पुढील तपासात पोलिसांनी सोनं, चांदीचे दागिने, दोन मोबाईल, एक बुलेट मोटरसायकल आणि रोख ₹57,000/- असा एकूण ₹4,89,600/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यापूर्वी दोन आरोपी — संतोष भाउराव शिंदे (रा. मुर्तीजापूर, जि. अकोला) आणि अब्दुल अतीक अब्दुल रफिक (रा. अलीमनगर, अमरावती) — यांना अटक करण्यात आली असून ते सध्या अमरावती कारागृहात आहेत.

फरार आरोपीचा शोध सुरू असून, पोलिसांनी त्यासाठी विशेष पथक नेमले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मनिष ठाकरे, आणि पोलीस निरीक्षक श्री. सुरज बोंडे (पो. स्टे. अंजनगाव सुर्जी) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुरज तेलगोटे, पोहवा जयसिंग चव्हाण, पोशिं. रवि राठोड, मोहसिन पठाण, शुभम मारकंड, आकाश रंगारी, अमित घाटे, अंकुश सयाम, विशाल थोरात, प्रमोद चव्हाण, मपोहवा दिपाली तेलगोटे यांनी केली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.