महत्वाचे

अभियंता कार्यालयात हजर नाहीत, ग्राहक हैराण! — वीजपुरवठा खंडित, उपोषणाचा इशारा

अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कुंभारगाव (निंभारी) फाट्यावर असलेल्या विद्युत वितरण कार्यालयात मोठ्या प्रमाणात विद्युत लपंडाव आणि गैरव्यवस्था असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्राहकांकडून करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात विद्युत पुरवठा या सब-सेंटरमार्फत होत असला तरी वारंवार वीजपुरवठा खंडित राहतो. संबंधित केंद्राचे अभियंता भूषण गावंडे हे कार्यालयात नियमितपणे उपस्थित राहत नसल्याचा आरोप असून, ग्राहक वारंवार कार्यालयात जाऊनही त्यांची भेट होत नसल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सुद्धा ते फोन उचलत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्राहकांनी सांगितले की, “कधी भेट झाली तरी अभियंता उद्धटपणे वागत असून त्यांच्या विरोधात बोलण्यास कर्मचारीही घाबरतात.” परिणामी, सब-सेंटर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, कृषी पंप बंद राहतात आणि रब्बी हंगाम धोक्यात येत आहे.

या संदर्भात ग्राहकांनी परतवाडा येथील वरिष्ठ अभियंता अंधारे आणि दर्यापूरचे डी.वाय. कटोले यांच्याशी संपर्क साधला. कटोले यांनी सांगितले की, “जर अभियंता गावंडे हे कार्यालयात हजर राहत नसतील तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल.”

ग्राहकांचा इशारा आहे की, “जर तात्काळ कारवाई झाली नाही तर उपोषण छेडले जाईल.”

या प्रकरणाची दखल घेत दर्यापूर-अंजनगाव विधानसभा आमदार गजानन लवटे यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितले की, “या प्रकरणाची सखोल चौकशी करून नागरिकांचे समाधान केले जाईल.”

स्थानिक नागरिकांचा ठाम आग्रह आहे की, “अभियंता भूषण गावंडे यांची बदली तातडीने करण्यात यावी आणि सब-सेंटरमधील वीजपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यात यावी.”

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.