महाराष्ट्र

“समाजसेवेच्या तेजस्तंभाला मानाचा मुजरा : संगीता गोविंद मेण यांना ‘स्वामी विवेकानंद युवाश्री’ पुरस्काराने गौरव”

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : सामाजिक बांधिलकीची ओळख जपणाऱ्या आणि निःस्वार्थ सेवेला जीवनधर्म मानणाऱ्या समाजसेविका संगीता गोविंद मेण यांना प्रतिष्ठेचा ‘स्वामी विवेकानंद युवाश्री’ पुरस्कार जाहीर झाला असून, अकोला येथे आयोजित तरुणाई फाऊंडेशन कुटासा यांच्या ७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांना हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला.

पंतजली महिला योग समितीच्या संघटन मंत्री म्हणून तसेच लोकजागर परिवार या सामाजिक व्यासपीठातून महिलांमध्ये आरोग्यजागर, जनसामान्यांमध्ये सेवा व संवेदना जागृत करणारे उपक्रम, ग्रामीण भागातील भान जागविणारी चळवळ अशा विविध समाजोपयोगी कार्यांद्वारे संगीता मेण यांनी सातत्याने समाजसेवेची ज्योत प्रज्वलित ठेवली आहे.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मराठी टीव्हीवरील लोकप्रिय हास्यजत्रा फेम कलाकार कुणाल मेश्राम यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. साहित्य, कला, काव्य, गझल आणि विविध सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या साक्षीने हा सोहळा अधिकच लक्षणीय ठरला.

या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन तरुणाई फाऊंडेशन कुटासा चे संदीप दादा देशमुख यांनी केले असून, बहुसंख्य कलावंत, कवी, लेखक, रसिक यांची उपस्थिती कार्यक्रमाला शोभा आणणारी ठरली.

सन्मान स्वीकारताना संगीता मेण यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या,
“सेवा हीच आमची पूजा, सेवा हाच परमधर्म. या गौरवाचा मान माझ्या कार्याला साथ देणाऱ्या सर्वांचा आहे.”
त्यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

पंतजली योग समिती आणि लोकजागर परिवार यांनी संगीता मेण यांचे या सन्मानाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.