युवा मित्र मंडळ,पुसलाचे टोल नाका विरोधात तहसीलदार यांना निवेदन..!

अमरावती-पांढूर्णा राष्ट्रीय महामार्गांवर पुसला नजिक नव्याने टोल नाका सुरु झालेला आहे.
स्थानिक नागरिकांना कडून एका वेळचे ४०₹/ ३४०₹ महिना टोल आकारण्यात येत आहे.
परंतू स्थानिक नागरिकांच्या वाहनावर पूर्णपणे टोल माफी द्यावी कारण नागरिकांची शेती, गुरांचे गोठे, घरे टोल नाक्याच्या आजूबाजूस असल्यामुळे त्यांना वारंवार ये जा व शेतीमाल आणावा लागतो, तेव्हा सामान्य शेतकऱ्यांनी व नागरिकांनी कितीदा टोल हा भरावा,
म्हणून पुसला, लोहद्रा, उराड, पंढरी, महेंद्री, करवार, लिंगा, पिपलागड, जामगांव,कारली,एकलविहीर, जामठी, गणेशपूर, सावंगी, धनोडी, मालखेड, शेघाट यांना टोलमध्ये पूर्णपणे सूट द्यावी.
अन्यथा येत्या १० दिवसामध्ये टोलनाका फोडो आंदोलन करण्यात येईल. असे युवा मित्र मंडळ पुसला अध्यक्ष सुरज धर्मे यांच्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन देण्यात आले.
यावेळी ओबीसी महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष प्रविण वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका प्रमुख विजय
वडस्कर, किसना उमक, युवा मित्र मंडळ अध्यक्ष सुरज धर्मे, उपाध्यक्ष जावेद शेख, अमर इवनाते,कमलेश खपरिये, गोपाल सर्याम, धिरज सावरकर,प्रमोद पाटील,सागर फरतोडे, विलास मरकाम, शुभम वडस्कर,प्रज्वल कोरडे,पिंटू कोरडे,नरेश इवनाते,सुरज भाकरे,अमन पाटील, नवनीत काळमेघ,राजू मरस्कोल्हे,प्रभाकर धुर्वे आदी उपस्थित होते.

