ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

दीड हजार कर्मचारी सांभाळणार ४१८ मतदान केंद्रांची धुरा

अमरवती : जिल्ह्यातील दहा नगरपालिका व दोन नगरपंचायतींसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी ४१८ मतदान केंद्रे निश्चित केले आहेत. याकरिता करण्यात आले आहे. या मतदार केंद्राची धुरा सांभाळण्यासाठी निवडणूक विभागाचे १,८४० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

जिल्ह्यातील अंजनगाव सुजी, दर्यापूर, अचलपूर, चिखलदरा, चांदुर बाजार, मोर्शी, वरूड, शेंदुर्जना घाट, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे या दहा नगरपरिषदा आणि धारणी व नांदगाव खंडेश्वर अशा दोन नगरपंचायतीसाठी मंगळवार २ डिसेंबर रोजी सार्वत्रिक मतदान होणार आहे. १५५ प्रभागांत होऊ घातलेल्या या निवडणुकीत तीन लाख ५९ हजार ५६ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. दहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतीत ही निवडणूक होत आहे. मुख्य केंद्राध्यक्षांसह सहकारी केंद्र सहायक नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.