ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

जोरदार कारची आमदाराच्या दुचाकीला धडक, राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके अपघातात जखमी

आमदार संजय खोडके यांच्या दुचाकीला कारनं धडक दिली. या अपघातात संजय खोडके जखमी झाले आहेत.

अमरावती – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांच्या दुचाकीला कारनं धडक दिली. या अपघातात आमदार संजय खोडके जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी 3 वाजता कठोरा नाका येथील शाकुंतल कॉलनी परिसरात हा अपघात झाला. आमदार संजय खोडके यांनी रुग्णालयातून व्हिडिओ प्रसिद्ध करत कार्यकर्त्यांना आवाहनं केलंय.

पायाला आणि मणक्याला दुखापत – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय खोडके हे नवसारी परिसरातून बैठक आटपून शाकुंतल कॉलनी परिसरात बैठकीला निघाले असताना विरुद्ध दिशेनं येणाऱ्या कारनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात संजय खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला दुखापत झाली. त्यांना रिम्स या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

 

रुग्णालयातून कार्यकर्त्यांना व्हिडिओद्वारे संदेश – आमदार संजय खोडके यांच्या अपघाताची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच खळबळ उडाली. दरम्यान, संजय खोडके यांनी उपचारानंतर स्वतः व्हिडिओ संदेश प्रसारित करून आपल्या प्रकृतीची माहिती दिली. “कोणीही काळजी करू नका किंव्हा मला भेटायला येऊ नका. मी बरा आहे,” असं संजय खोडके यांनी म्हटलं. रविवारी सायंकाळी आयोजित पक्षाच्या बैठकीला मी उपस्थित राहणार असल्याचं देखील संजय खोडके यांनी स्पष्ट केलं.

नेत्यांचा जोरदार प्रचार – राज्यातील नगरपालिका निवडणुकांनंतर आता महानगरपालिका निवडणुका होत आहेत. अनेक वर्षांनी या निवडणुका होत असल्यानं राजकीय पक्षांसह इच्छुकांनीही जोरदार तयारी सुरू केलीय. तिकीटासाठी प्रत्येकजण आपआपली फिल्डिंग लावण्यात व्यस्त आहे, तर नेतेमंडळीही जोरदार प्रचार करत आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.