महाराष्ट्र

“एकता–श्रद्धेचा दिव्य वारसा : संताजी जयंती महोत्सव भव्यतेने साजरा”

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
देवगिरे नगरचा सारा परिसर सोमवारी भक्तिभावाच्या मंगल प्रकाशाने न्हाऊन निघाला. तेली समाज पंच मंडळाच्या वतीने आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सवाने समाजातील ऐक्य, संस्कार आणि सामाजिक जागृतीचा संदेश अधिक तेजस्वीपणे भारून टाकला. संतांच्या अखंड कर्मयोगाची आठवण करीत त्यांना सामूहिक कृतज्ञतेची वंदने अर्पण करण्यात आली.

महोत्सवातील विशेष आकर्षण ठरले ते १० वी आणि १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा. प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह देऊन या विद्यार्थ्यांना उभे राहून दाद देण्यात आली. ज्ञान–संस्कारांच्या वाटचालीला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम पाहणाऱ्यांच्या मनाला स्पर्शून गेला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत संताजी महाराजांच्या तत्त्वज्ञानाचे स्मरण करीत समाजात ऐक्य, प्रामाणिकता, शिक्षणाची नितांत गरज, आत्मविकास आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश प्रभावी शब्दांत अधोरेखित केला. “संतांच्या प्रकाशात चालताना समाजाने अधिक जागरूक, संवेदनशील आणि एकदिलाने पुढे सरकायला हवे,” असे आवाहन अनेक मान्यवरांनी केले.

महोत्सवाला परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. त्यात आमदार गजानन लवटे, माजी आमदार रमेश बुंदिले, वैभव लेंधे, डॉ. फाटे, मधुराताई लेंधे, गटशिक्षणाधिकारी खोडे साहेब, नितीन गोमासे, मुकुंद माकोडे, सुधीर देवगिरे, झापर्डे साहेब, मुन्नाभाऊ इसोकार, खोडे मॅडम, रुपालीताई देवगिरे, हेमाताई लेंधे, रेखाताई कुऱ्हेकर, स्पृहाताई डकरे, घोडे सर, प्रवीण नेमाडे, कृष्णा गोमासे, अविनाश गायगोले, इंजि. सुयोग खाडे, इंजि. यश लवटे यांचा समावेश होता. तेली समाजाचे बंधू–भगिनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाला दिव्यता प्राप्त करून दिली.

संतांच्या विचारांचा सुवास पसरवणारा हा महोत्सव एकता, संस्कार आणि सामाजिक विकासाचा तेजोत्सव म्हणून लक्षात राहील.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.