महाराष्ट्र

शहराच्या प्रगतीसाठी थेट मंत्रालयात संवाद — डॉ. स्पृहा डकरे यांची उपमुख्यमंत्री शिंदेंशी निर्णायक भेट

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी शहराच्या विकासासाठी आशेचा नवा किरण निर्माण करणारी महत्त्वाची भेट नुकतीच पार पडली. शिंदे गटाच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. सौ. स्पृहा अतुल डकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा त्यांच्या समोर सादर केला.

या भेटीत अंजनगाव सुर्जीतील रखडलेली विकासकामे, वाढती नागरी लोकसंख्या आणि त्यानुसार आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित प्रश्नांबाबत डॉ. डकरे यांनी सखोल मांडणी केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंजनगाव सुर्जीच्या विकासाबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “शहराच्या विकासासाठी निधी कधीही अडसर ठरणार नाही. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, हा शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे.” विकासकामांना प्राधान्य देत तातडीने आवश्यक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

या भेटीमुळे अंजनगाव सुर्जीच्या विकासाला गती मिळणार असून, शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एक ठोस दिशा ठरली आहे. नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, अंजनगाव सुर्जी आता नव्या विकास पर्वाकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.