ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

धामणगाव रेल्वेत भाजपाचा झेंडा, चिखलदऱ्यात काँग्रेसचा जल्लोष

धामणगाव रेल्वे नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षासह सर्व 20 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झालेत. नगराध्यक्षा पदावर अर्चना अडसड रोठे या 1,365 मतांनी विजयी झाल्यात.

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होताना धामणगाव रेल्वे नगरपरिषदेत नगराध्यक्षासह सर्व 20 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झालेत. तर चिखलदरा नगरपरिषदेत काँग्रेसनं मोठा विजय मिळवून सर्वांना धक्का दिलाय.

 

धामणगावात जल्लोष : धामणगाव रेल्वे नगरपरिषद निवडणुकीचा निकाल स्पष्ट होताच भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल ताशांचा नाद आणि गुलाल उधळत जल्लोष केला. नगराध्यक्षा पदावर अर्चना अडसड रोठे या 1,365 मतांनी विजयी झाल्यात. “धामणगाव रेल्वे प्रभागातील मतदारांनी विकासावर विश्वास ठेवून मला मोठा विजय मिळवून दिला,” अशी प्रतिक्रिया अर्चना अडसड रोठे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांवर जनतेचा विश्वास असल्यामुळं धामणगाव रेल्वेत भाजपाचे 20 ही नगरसेवक निवडून आलेत,” असं आमदार प्रताप अडसड रोठे म्हणाले.

 

चिखलदरा नगरपरिषदेवर काँग्रेसचं वर्चस्व : चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर काँग्रेसचे शेख अब्दुल हे 431 मतांनी विजयी झालेत. चिखलदरा इथं काँग्रेसचे एकूण 12 सदस्य विजयी झालेत, तर भाजपाच्या 7 सदस्यांनी निवडणुकीत विजय मिळवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कलोती हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेत. धारणी नगरपंचायतीमध्ये भाजपाचे सुनील चौथमल हे नगराध्यक्ष पदावर निवडून आलेत.

चांदूर रेल्वेत वंचितच्या प्रियंका विश्वकर्मा विजयी : चांदूर रेल्वे नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा या नगराध्यक्षा म्हणून विजयी झाल्यात. या ठिकाणी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचं वर्चस्व मोडीत काढून पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीनं बाजी मारली.

दर्यापूर नगरपरिषदेत काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाखळे यांचा विजय : सहकार नेते सुधाकर भारसाखळे यांच्या पत्नी मंदाकिनी भारसाखळे या दर्यापूर नगरपरिषदेच्या नव्या नगराध्यक्षा म्हणून विजयी झाल्या आहेत. भाजपाला केवळ चार जागा मिळाल्या असून, दर्यापूर नगरपरिषदेत काँग्रेसचे एकूण 18 नगरसेवक निवडून आलेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.