ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

ध्वजारोहणासाठी निघालेल्या ३ शाळकरी मुलींना भरधाव ट्रॅव्हल्सने चिरडले

स्वातंत्र्यदिनी हिंगणघाट हादरले

हिंगणघाट प्रतिनिधी  एकिकडे संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात न्हाऊन निघाला असताना, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरावर मात्र अचानक दुखाचा डोंगर कोसळला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडलेल्या तीन शाळकरी मुलींच्या दुचाकीला एका सुसाट खासगी ट्रॅव्हल्सने चिरडल्याची धक्कादायक घटना आज घडली. या भीषण अपघातात तिन्ही अल्पवयीन विद्यार्थिनींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि मिसबा शेख अशी या दुर्घटनेत बळी पडलेल्या मुलींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी या तिघीही मैत्रिणी एकाच दुचाकीवरून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बाहेर निघाल्या होत्या. त्यांचा प्रवास आंबेडकर शाळेजवळ आला असतानाच, पाठीमागून अत्यंत वेगाने आलेल्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बसची धडक इतकी भयंकर होती की, दुचाकीवरील तिन्ही मुली थेट रस्त्यावर फेकल्या गेल्या. यात त्यांना अत्यंत गंभीर दुखापत झाली. अपघात घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलींना त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही तिघींनाही वाचवण्यात यश आले नाही. उपचारादरम्यान या चिमुकल्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.