ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मोठी बातमी! अमरावतीच्या जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला भीषण आग, तीन बालकांचा मृत्यू

अमरावतीच्या जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली.

अमरावती – अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला सोमवारी पहाटे साडेतीन वाजता भीषण आग लागली. या आगीत एकूण तीन नवजात बाळ दगावल्याची दुर्दैवी घटना घडली.

पहाटे साडेतीनला लागली आग – जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे साडेतीन वाजता भीषण आग लागली. यावेळी नवजात शिशु अतिदक्षता विभागात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही आग इतकी भीषण होती की अवघ्या काही वेळात रौद्ररूप धारण केलं.

 

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात धाव घेतली. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

सहा बालकांवर इतर ठिकाणी उपचार सुरू – या घटनेवेळी नवजात शिशु अतिदक्षता विभागात एकूण नऊ बालक दाखल होतो. या भीषण घटनेत तीन बालक दगावले, तर सहा बाळांना कर्मचाऱ्यांनी अतिदक्षता विभागातून तातडीनं बाहेर काढलं. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

कक्षातील बालकांना वेगाने बाहेर काढले – प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेतीन वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे लागलेली आग अतिदक्षता विभागात वेगाने पसरली. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या कक्षातील बालकांना वेगाने बाहेर काढले.

तीन बालकांचा मृत्यू – अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर एकूण तीन नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहेत. या तीन कक्षांमध्ये प्रत्येकी 13 अशी मिळून 39 नवजात बालकांवर उपचार घेण्याची क्षमता आहे. यापैकी एका कक्षात आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर आणि नर्सेस, कर्मचाऱ्यांनी या कक्षातील लहान बाळांना बाहेर काढले. मात्र, यात तीन बालकांचा मृत्यू झाला.

ज्या बालकांचं वजन कमी असतं, ज्या मातांची लवकर प्रसुती होते, ज्या बालकांना जन्मल्यानंतर वाढीमध्ये काही समस्या असतात किंवा डॉक्टरांना ज्या बालकांना विशेष देखरेखीखाली ठेवायचं असतं, अशा बाळांना नवजात शिशु अतिदक्षता विभागात ठेवलं जातं. सोमवारी मध्यरात्री 3.30 च्या सुमारास व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग भडकली. NICU कक्ष या आगीत जळून खाक झाला.

पोलीस आयुक्तांनी केली पाहणी – अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. “या आगीमागचं नेमकं कारण काय? याची चौकशी केली जाईल,” असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.