ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अमरावतीच्या गणेशभक्तांना वाहतूक कोंडीची धास्ती; अनेकांनी रात्रीच गणरायाला आणलं घरी

अमरावती शहरातील राजकमल चौक, जयस्तंभ चौक ते रेल्वे स्टेशन आणि बस डेपोला जोडणारा उड्डाणपूल पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळं प्रचंड कोंडी झाली आहे.

अमरावती : ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत अनेक अमरावतीकरांनी यावर्षी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच आपल्या बाप्पांना घरी नेलं. अमरावती शहरातील सर्वात जुना राजकमल आणि जयस्तंभ चौकाला जोडणारा रेल्वे पूल बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळं मंगळवारी प्रचंड कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीच्या संकटात सापडण्यापेक्षा विघ्नहर्ताला घरी नेण्याची लगबग मध्यरात्रीपर्यंत सुरू होती.

सायन्सस्कोर आणि नेहरू मैदानावर गर्दी : श्री गणरायाच्या मूर्तींची दुकानं जिल्हा परिषदेच्या सायन्सस्कोर आणि राजकमल चौक येथील महापालिकेच्या नेहरू मैदान येथे थाटली आहेत. याठिकाणी असणाऱ्या सुंदर मूर्ती गणेशभक्त एक दोन दिवसांपूर्वी आगाऊ रक्कम देऊन निश्चित करून ठेवतात आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांना मोठ्या थाटात घरी नेतात. यावर्षी शहरातील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळं अनेक कुटुंब रात्री १० वाजल्यानंतर आणि शहर शांत झाल्यावर आपल्या गणरायाला घरी नेण्यासाठी बाहेर पडले. यामुळं सायन्स्कोअर आणि नेहरू मैदान येथे रात्री एक आणि दीड वाजेपर्यंत बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी होती.

दिवसा वाहतूक कोंडीची भीती : ऐन गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी ६४ वर्ष जुना राजकमल चौकाच्या दिशेनं जाणारा रेल्वे पूल खराब झाला आहे. त्यामुळं या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नवसारी, कठोर नका, गाडगेनगर, अर्जुन नगर, राहटगाव, तपोवन, वडाळी, चपराशी पुरा, रुक्मिणी नगर, कांता नगर अशा विविध भागातून दररोज लाखो वाहने या पुलावरून जातात. एसटी, बस देखील या पुलावरून बसस्थानकडे जातात. हा पूल बंद केल्यामुळं गत तीन दिवसापासून अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. रात्री रस्ते शांत असल्यानं अनेकजण गणरायाला नेण्यासाठी रात्री १० नंतर घराबाहेर पडले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.