ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अखेर ‘ते’ २८०० जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रद्द; यादी प्रसिद्ध

१९ ऑगस्ट २०२३ ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यानच्या दाखल्यांना फटका

अमरावती : गत काही दिवसांपासून बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रकरण गाजत असताना महसूल विभागाने अमरावती जिल्ह्यातील सुमारे २८०० जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले आहेत. १९ ऑगस्ट २०२३ ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यानच्या दाखल्यांना फटका बसला असून महसूल विभागाच्या आदेशानुसार ही कायर्वाही करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने सोमवार, ८ सप्टेंबर रोजी अधिकृत कळविले आहे.

अमरावती तहसील कार्यालय यांचे पत्र १८ मार्च २०२५ रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती महानगरपालिका येथे प्राप्त झाले. त्याअनुषंगाने १९ ऑगस्ट २०२३ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीमधील स्थगिती आदेशापर्यंत निर्गमित झालेल्या जन्म मृत्यू प्रमाणपत्रापैकी जे प्रमाणपत्र तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निर्गमित केलेले आहेत, ते जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. आणि या दाखल्यांची यादी अमरावती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात आलेली आहे, असे पत्राद्वारे कळविले आहे.

 

हे प्रमाणपत्र वापरता येणार नाही महसूल विभागाच्या आदेशानुसार जन्म-मृत्यू प्रमाणपत्राचा वापर कोणत्याही शासकीय, निमशासकीय कामासाठी करता येणार नाही. यापुढे कोणत्याही शासकीय योजनेकरिता अथवा पासपोर्ट काढण्याकरिता किंवा अन्य कुठेही या कालावधीतील दाखल्याचा वापर करू नये, असे महानगरपालिका प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.

 

१९ ऑगस्ट २०२३ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीतील स्थगिती दिलेले जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे नगरपंचायत, नगरपरिषदा, मनपाला कळविले आहे. ज्यांच्याकडे या कालावधीत दाखले आहेत, ते कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय कामासाठी वापरता येणार नाही.

विजय लोखंडे, तहसीलदार, अमरावती.

१७ महिन्यांच्या कालावधीतील प्रमाणपत्र अमरावती जिल्ह्यातील शहर, ग्रामीण अशा दोन्ही भागात चौकशीअंती १९ ऑगस्ट २०२३ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधी २८०० जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. हे दाखले १७महिन्याच्या कालावधीतील आहे. प्रशासनाने तशा नोंदी घेतल्या असून या कालावधीत हे प्रमाणपत्र आढळल्यास ते जमा करून घ्यावे, असे निर्देशही महसूल विभागाने दिले आहे. या निर्णयामुळे ज्यांच्याकडे हे जन्म, मृत्यूचे प्रमाणपत्र आहे, त्यांना मोठा फटका बसला आहे.

 

अमरावती महापालिका हद्दीत सुमारे १७०९ जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. महसूल विभागाच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली. ती यादी मनपाच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध आहे. एप्रिल २०२५ मध्ये या प्रमाणपत्राची छाननी झाली होती.

डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.