ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

पंतप्रधान मोदी आज पंजाब आणि हिमाचल प्रदेशला भेट देणार, पूरग्रस्त भागांची पाहणी करणार

पंतप्रधान मोदी पहिल्यांदा दुपारी 1:30 वाजता हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे पोहोचतील, जिथे हवामान अनुकूल असल्यास ते सर्वाधिक बाधित भागांचे हवाई सर्वेक्षण करतील.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत. त्यावेळी ते आपत्ती प्रतिसाद आणि पुनर्वसन प्रयत्नांचा आढावाही घेतील. संपूर्ण उत्तर भारतात मान्सूनने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.

ते सर्वाधिक बाधित भागांचे हवाई सर्वेक्षण करणार : मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी पहिल्यांदा दुपारी 1:30 वाजता हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे पोहोचतील, जिथे हवामान अनुकूल असल्यास ते सर्वाधिक बाधित भागांचे हवाई सर्वेक्षण करतील. त्यानंतर ते धर्मशाळा येथे एका उच्चस्तरीय आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील, जिथे त्यांना राज्य प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि स्थानिक आपत्ती मित्र स्वयंसेवकांसह इतर बचाव आणि मदत संस्था माहिती देतील.

पंजाबमध्ये परिस्थिती खूपच वाईट : तसेच ते आपत्तीग्रस्तांशी थेट संवाद साधतील आणि त्यांच्याकडून परिस्थिती समजून घेतील. हिमाचल प्रदेशातील त्यांच्या कार्यक्रम आणि त्यानंतर पंतप्रधान राज्यातील पूरग्रस्त भागांचे हवाई सर्वेक्षण केल्यावर संध्याकाळी 4:15 वाजता ते पंजाबमधील गुरुदासपूर येथे पोहोचणार आहेत. पंजाबमध्येही पुरामुळे कहर माजला आहे. या पुराने दशकांचा विक्रम मोडीत काढलाय. पंजाबमध्ये पुरामुळे मृतांचा आकडा 46 वर पोहोचला आहे. त्याचबरोबर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 1.75 लाख हेक्टर शेतीयोग्य जमिनीवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

हिमाचल प्रदेशातही परिस्थिती भयंकर : तसेच हिमाचल प्रदेशातही पुरामुळे परिस्थिती चांगली नाही. ढगफुटीमुळे येथे बरंच नुकसान झालंय. 20 जून ते सोमवार 8 सप्टेंबरपर्यंत ढगफुटी, मुसळधार पाऊस, भूस्खलन यामुळे कोट्यवधींचं नुकसान झालंय. आतापर्यंत 370 जणांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. डोंगराळ भागांबद्दल बोलायचे झाल्यास येथे रस्ते अपघातात सुमारे 165 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 41 जण अजूनही बेपत्ता आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून हिमाचल प्रदेशात भूस्खलनाच्या 136 घटनांची नोंद झाली आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.