महाराष्ट्र

महायुती सरकारच्या धोरणाविरुद्ध शेतकऱ्यांचे “भाकर ठेचा आंदोलन” – अजंनगाव सुर्जी तालुक्यात संतापाची लाट

  • सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : ऐन दिवाळीच्या सणासमयी महायुती सरकारने जनतेची उपहासात्मक वागणूक केल्याचा आरोप करत आज अजंनगाव सुर्जी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर “भाकर ठेचा आंदोलन” करून सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप येवले म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. मात्र सरकार मदत देण्याऐवजी थट्टा करत आहे. अजंनगाव सुर्जी तालुक्याला मदत यादीत वगळण्यात आले होते, नंतर शेतकऱ्यांच्या दबावाखाली समाविष्ट केले गेले, आणि आता दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन देऊनही एक रुपया मदत दिला नाही.”

ते पुढे म्हणाले, “मंत्र्यांच्या घरात पुरणपोळी, तर सामान्य शेतकऱ्यांच्या वाट्याला ज्वारीची भाकरी – हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. तातडीने मदत मिळाली नाही, तर शेतकरी या असंवेदनशील सरकारचे राजकीय भविष्य अंधारमय करतील. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत धडा शिकवला जाणार आहे.”

या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतीकात्मक पद्धतीने भाकरी ठेचण्यात आल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली.

आंदोलनाचे नेतृत्व प्रदीप येवले, अफसर बेग, राजेश तायडे, रवी अंभोरे, मधुकर मोरे, ज्ञानेश्वर गोबरे, फहीमभाई, साधनाताई कोकाटे, मिनाताई कोल्हे, इंगळे ताई, विनोद सरदार, सुरज फुके, प्रमोद पाटील कुकडे, अनंत हरणे, अजय शिराळकर, हेमंत मळसने, सुनील येवले, जावेदभाई, अनिल शिरोळे, पुरुषोत्तम चर्हाटे, अजाबरावजी सरदार, रामकृष्ण पाटील गावंडे, सुभाष पाटील गोळे, गोपाल आमले, रविन्द्र शेवाळे, बाळासाहेब पवार, सुनील कोकाटे, रघुनाथराव भुयार, प्रमोद येवले, ज्ञानेश्वर भुयार, अवी येवले, पवन चौधरी, प्रदीप पोहनकर, रोषण पोहनकर, सुरेन्द्र वाघमारे, प्रशांत पोहनकर, देवानंद पवार, समीभाई, अमीनसेठ एजाजभाई यांनी केले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.