शेतकऱ्यांना वाढीव निकषाने शासन मदत मिळणार केव्हा?
आतापर्यंत प्रचलित निकषाने मिळाली मदत, वाढीवसाठी प्रतीक्षेत

अमरावती : शासनाने बाधित ऑक्टोबरच्या ‘जीआर’ नुसार अतिवृष्टीने क्षेत्रासाठी नुकसानीची मर्यादा दोनच्या ऐवजी तीन एकर केली. शिवाय प्रत्येक शेतकऱ्याला रब्बीच्या तयारीसाठी १० हेक्टरी १० हजारांची मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात जुन्याच निकषाने शासन मदत दिलेली आहे. त्यामुळे वाढीव मदत केव्हा, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
जून ते सप्टेंबरदरम्यान २,१६,५०४ शेतकऱ्यांच्या १,६९,७४५ हेक्टरमधील शेतीपिकांचे नुकसान झाले. शासनाने पहिल्या टप्प्यात १०८.७१ कोटी व दुसऱ्या टप्प्यात ३८ कोटींची मदत मंजूर केली.
१० हजार मिळालेच नाही शासनाने तीन हेक्टर मर्यादेत मदतीचा शासनादेश काढला तरी प्रत्यक्षात मदत दोन हेक्टर मर्यादेतच मिळत आहे. शिवाय बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या तयारीसाठी प्रति हेक्टरी १० हजारांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात ही मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलीच नाही.. या शासन मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
नुकसानीची जिल्हास्थिती पहिल्या टप्प्यात जून ते ऑगस्ट दरम्यान १,६८,५३३ शेतकऱ्यांच्या १,२३,७६३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले, यासाठी १०८.७१ कोटींची मदत उपलब्ध झालेली आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात ४८,०७१ बाधित शेतकऱ्यांच्या ४५,८८२ हेक्टरमधील पिकांच्या नुकसानीसाठी ३८ कोटी उपलब्ध केले आहे. मात्र, ही शासन मदत प्रचलित निकषाने मिळाली आहे.
जिरायतीसाठी तीन हेक्टर मयदित ८५०० रुपये प्रती हेक्टर मर्यादा आहे. मात्र दोन हेक्टरचाच निधी मिळाला.

