देश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

उद्घाटनापूर्वीच अमित ठाकरेंकडून नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे अनावरण; पोलीस अन् मनसैनिकांमध्ये वाद

Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरेंनी स्व:त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटनापूर्वीच अनावरण केलंय. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Amit Thackeray नवी मुंबई : महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे आज नवी मुंबईच्या (Navi Mumbai) दौऱ्यावर आहेतयावेळी अमित ठाकरे शाखेच्या उद्घटनासाठी आले असता त्यांना असं कळलं कि, नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) स्मारकाचे अनावरण गेल्या अनेक महिन्यांपासून झालेलं नव्हतंतसेच महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवली होतीहे बघताच अमित ठाकरेंनी स्व:त या पुतळ्याचे अनावरण केलंयावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होतेतर पोलीस आणि मनसे सैनिकांमध्ये काही काळ झडप झाल्याचेही चित्र बघायला मिळेलया कृत्यासाठी माझ्यावर कारवाई होते असेल तर हि माझ्या आयुष्यातील पहिली केस होणार आहेमात्र वेळ आली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेवू, असा पवित्र अमित ठाकरेंनी घेतला.

 

Amit Thackeray : वेळ आली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेवू

मी शाखा उद्घटनाच्या कार्यक्रमासाठी या भागात आलो होतोदरम्यान मला असं कळलं कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा गेल्या चार महिन्यांपासून तयार होऊन आहेत्यावर आता धूळ साचते आहेहा पुतळा लोकांच्या मागणीवरून लोकांसाठी झाला आहेमात्र सरकारमधल्या कुठल्याही नेत्याला अथवा मंत्र्याला महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करायला वेळ मिळत नसल्याचे दिसतंयत्यामुळे गेल्या चार महिन्यापासून हे स्मारक धूळखात पडलं आहेत्यावर धूळ जमतेयमला ते बघवलं नाहीम्हणून मी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलंमला असं वाटतं माझ्यावर या बाबत कारवाई केली जाईलमात्र या कारवाईचा मला आनंद आहेमाझ्या राजकीय जीवनातील जी कुठली पहिली केस असेल ती महाराजांसाठी असेल आणि त्याचा मला आनंद असेलअशी प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी यावेळी बोलतांना दिली.

Amit Thackeray : …..म्हणून आज आम्ही महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं

गेल्या चा महिन्यात अनेक नेतेमंत्री नवी मुंबईत आले आहेतअगदी पंतप्रधान मोदी नवी मुंबईत विमान उद्घटनासाठी आलेतमुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री येऊन गेलेतदहिहांडीपक्ष प्रेवशाच्या वेळी येऊन गेलेतमात्र ज्यांना आपण आराध्य दैवत मानतो त्या छत्रपतींसाठी त्यांना वेळ मिळत नसेल तर हि दुर्दैवी गोष्ट आहेमला हे बघवलं गेले नाहीमहाराजांना कपडा बांधून ठेवल्याचे आम्हा मनसे सैनिकांना आणि नवी मुंबईरांना बघावलं नाही म्हणून आज आम्ही महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलंअसेही अमित ठाकरे यावेळी म्हणाले

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.