ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मुलीनं वयाच्या ६ वर्षांपासून बंद खोलीत काढली २० वर्षे; सुटकेनंतर अधिकाऱ्यानं दिली धक्कादायक माहिती

छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात एका मुलीनं बालपणापासून २० वर्षे तुरुंगात काढली आहेत. तिच्या सुटकेनंतर समाज कल्याण अधिकाऱ्यानं धक्कादायक माहिती दिली.

बस्तर (रांची) – जर आपल्याला कोणी अर्धा तास खोलीत कोंडले तरी नक्कीच खूप भीती वाटेल. पण, एका मुलीनं २० वर्षे अंधार असलेल्या खोलीत घालविली आहेत. या खोलीला खिडकीदेखील नव्हती. तसेच तिला बोलण्यासाठी कुणीही येत नव्हतं. तिची काय स्थिती झाली असेल? धक्कादायक बाब म्हणजे मुलगी २० वर्षे खोलीत कोंडून राहत असताना पित्यानं कोणतंच पाऊल उचललं नाही.

पीडित मुलीचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. पीडिता सहा वर्षांची शाळेत जात असताना तिला गावातील तरुणानं मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर मुलगी एवढी घाबरली की तिनं सगळ्यांशी बोलणं बंद करून टाकलं.

पीडितेची सुटका झाल्यानंतर समाज कल्याण विभागाच्या उपसंचालक सुचित्रा लकडा यांनी सांगितलं, मुलीच्या मनात एवढी भीती होती की, तिनं खोलीत स्वत:ला बंद करून घेतलं. तिच्या पित्यानंही मुलीला खोलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही. धमकी दिलेल्या तरुणाकडून मुलीला काही अपाय होऊ नये, यासाठी पित्याला काळजी वाटत होती. केवळ जेवण देण्याकरिता दरवाजा उघडला जात होता. पीडित मुलीची वेळीच सुटका झाली असती तर तिचे जीवन दु:खी झाले नसते, असे अधिकारी लकडा यांनी म्हटलं.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.