महाराष्ट्र

“महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात समतेच्या सूर्याला वंदन : महापरिनिर्वाण दिनाचा प्रेरणामय सोहळा”

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा सन्मानसोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मानवमुक्तीच्या संघर्षाला दिशा देणाऱ्या महामानवाच्या स्मृतिप्रित्यर्थ नतमस्तक होत उपस्थित मान्यवरांनी सामाजिक न्याय, समता आणि प्रबोधनाच्या मूल्यांना नव्याने साद घातली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करत त्यांच्या विचारांवर चिंतन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत शासकीय कंत्राटदार निलेश चिलात्रे, रवींद्र तायडे, तुराब शहा, श्रीराम फुलारी, दुर्गेश घोगरे, प्रदिप राजस, अविनाश राऊत, शुभम गवळी, मनोज ढेंगे, रूपेश तायडे, विशाल काळपांडे, अनिकेत कतोरे, राज सुलताने, ऋषीकेश वाकपांजर, शुभम ढेंगेकर आणि विशाल देवकर यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून बाबासाहेबांना कृतज्ञतांजली वाहिली.

समाजपरिवर्तनाचा प्रकाश अखंड प्रज्वलित राहावा, या भावनेतून सर्व उपस्थितांनी संविधानिक मूल्ये जपण्याची आणि सामाजिक एकात्मतेला बल देण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली. सभागृहात बाबासाहेबांविषयीचा आदर, चिंतन आणि प्रेरणास्रोत ठरणाऱ्या विचारांची जाणीव याने वातावरण भारावून गेले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.