ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मोर्शी आगाराच्या ताफ्यात पाच नव्या लालपरी दाखल

दोन्ही आगारातून १० नव्या फेन्या वाढल्या आहेत, वरूडलाही मिळाल्या पाच बसेस

मोर्शी : स्थानिक बस आगाराच्या ताफ्यात सोमवारपासून पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या. त्यांचे लोकार्पण आ. उमेश यावलकर यांच्या हस्ते करण्यात आले. वरूड व मोर्शी मिळून १० नव्याकोऱ्या बस ताफ्यात दाखल झाल्या. वरूड आगारालाही पाच बस मिळाल्या आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदारांच्या प्रस्तावास मान्यता देऊन एकूण १० नव्या बसना मंजुरी दिली. परिणामी २६ मे रोजी दोन्ही आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी नव्याने रुजू झालेल्या १० बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. मोर्शी येथे पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी एसटीचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे होते. प्रमुख अतिथी म्हणून योगेश ठाकरे, आगार व्यवस्थापक आशा वासनिक, ठाणेदार नितीन देशमुख, अशोक देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष उमेश कोंडे, सुनंदा लाडवीकर आदी उपस्थित होते. सर्वप्रथम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन उमाळे यांनी नारळ फोडून तसेच आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी फीत कापून उद्घाटन केले.

 

३५ फेऱ्या सुरू मोर्शी आगारातील एकूण ५० बस पैकी १५ फेऱ्या कमी झाल्या आहेत. काही बसेस भंगारमध्ये गेल्याने प्रवाशांना अडचण निर्माण होत होती. आता यामध्ये पाच नव्या बसची भर पडली. अशा एकूण ४० बस फेऱ्या मारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. दोन्ही आगारात उर्वरित बसेसचा भरणा डिसेंबर अखेरीस पूर्ण होणार असून यामध्ये नव्या इलेक्ट्रिक बस प्रवाशांसाठी सज्ज होणार असल्याची माहिती आ. यावलकर यांनी यावेळी दिली. संचालन आगार व्यवस्थापक आशा वासनिक व आभार प्रदर्शन निवृत्त एसटी चालक अशोक देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी, एसटी कर्मचारी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.