‘शिवाजीच्या’ पत्रकारिता विद्यार्थ्यांचा बसचालक-वाहकांसोबत रक्षाबंधन सण!
गेल्या 10 वर्षांपासून विद्यार्थी राबवतात उपक्रम!

अमरावती () : श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या (Shri Shivaji College of Arts and Commerce) जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांनी (Students) रक्षाबंधन सणानिमित्त एक हृदयस्पर्शी उपक्रम राबवत, कर्तव्यावर असलेल्या एस.टी. बसचालक व बसवाहकांना भावबंधाची राखी बांधली. प्राचार्य डॉ. अंबादास कुलट व विभागप्रमुख डॉ. कुमार बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रा. प्रतिक करंडे, प्रा. रुपेश फसाटे व प्रा. मनीष भंकाळे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. अमरावती डेपो व वर्कशॉप परिसरात सकाळ-संध्याकाळच्या पाळीतील पुरुष चालकांना विद्यार्थिनींनी राखी बांधली, तर महिला बसवाहकांकडून विद्यार्थ्यांनी राखी बांधून घेतली.
सारांश
आपुलकीने जोडलेला प्रत्येक जण हा आपला भावाच-बहिणीचाच असतो!
गेल्या 10 वर्षांपासून चालत आलेल्या या उपक्रमातून “कर्तव्यावर असतानाही रक्षाबंधनाची (Raksha Bandhan) उणीव भासू नये” हा भावनिक संदेश देण्यात येतो. वाहतूक नियंत्रक, चौकशी अधिकारी, वर्कशॉप कर्मचारी, चौकीदार यांनाही या भावबंधनात सामील करून, “सण केवळ कुटुंबापुरता मर्यादित नसून, आपुलकीने जोडलेला प्रत्येक जण हा आपला भावाच-बहिणीचाच असतो” हा मानवतेचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
प्रमुख अधिकारी उपस्थित!
यावेळी राज्य परिवहन महामंडळचे वाहतूक नियंत्रण अधिकारी जयसिंग चव्हाण, नरेंद्र गुप्ता, हर्षल धाराणे, (ए.डब्ल्यु अधिकारी) हरीओम इंगोले प्रमुख कारागीर, शैलेष विश्वकर्मा वरिष्ठ लिपक, लिपिक लिना ढाले, सुरज देशमुख,
त्याच प्रमाणे कारागीर, प्रथमेश फुटाणे, संदीप गणवीर, सतीश इंगोले, यांत्रिक अंशुल भालेराव, हर्षदा टाकले, राजेश कराडकर, वैशाली भोवसे, पवन गावणेर, नारायण किलेकर, यांचासह चालक, वाहक विजय खडसे, संदीप दखणे, सोमेश्वर हटवार, रोशन रेपाडे, नारायण खेडेकर, शंकर इंदुरकर, वैशाली भोसे, गजानन निस्ताने, प्रिया खाडे,भाष्कर गायकवाड, त्याच प्रमाणे पूजा लांडे, अमरावती डेपो मनोज आत्राव चांदुर बाजार डेपो, मनीष फंदे मोर्शी डेपो, ईश्वरी जाधव अमरावती डेपो, तसेच
डेपो व्यवस्थापक, वरिष्ठ निरीक्षक, वर्कशॉप प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये जनसंवाद विभागातील मानोज कराळे, साक्षी खेळकर, नेहा गणवीर, आकांशा मेश्राम, दिपाली भुसारी, समीर पळसपगार, सूरज साखरे, नेहा गणवीर, पूनम पाटील, दीक्षा गावंडे, श्रावणी अपाले, श्रृती सोनोने, हिमानी ढोबाळे, तनिषा हरणे, यश खंडारकर, आराध्य इसल, पियुष विश्वकर्मा, रतन जाधव, वैशाली चोरे, विद्यार्थी उपस्थित होते.

